breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘‘चांद्रयान- ३’’ च्या यशामुळे भारत अंतराळ संशोधनात बलशाली!

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या भावना: पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नवी सांगवी येथे आनंदोत्सव

पिंपरी: संपूर्ण जगाचे लक्ष या चांद्रयान-३ मोहिमेकडे लागले होते. भारतातील नागरिक या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. हे अभियान यशस्वी करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.  या यशस्वी मोहिमेमुळे भारत विज्ञानात जगात बलाढ्य आहे, यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हा क्षण विद्यार्थ्यांसोबत अनुभवता आले याचे समाधान वाटते, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या.

भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो)चे ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. हा ऐतिहासिक क्षण भारतीय जनता पार्टीतर्फे  नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत आनंदात आणि उत्साहात साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप आणि पदाधिकारी उपस्थित होते. देशाचा तिरंगा ध्वज हातात घेऊन विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच, कृष्णा चौक येथील जनसंपर्क कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात भंडारा उधळत पेढे वाटून हा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र तरटे, सुधाकर शितोळे, साहेबराव नणगे, सखाराम रेडेकर, शशिकांत नागणे, गणेश बनकर, राहुल कोंढरे,अमोल तावरे, सुनील कोकाटे, प्रवीण पाटील, संजय मराठे, मिलिंद कंक, ललित म्हसेकर, उमेश झरेकर, संदीप दरेकर, ओमकार माटे, मनीष रेडेकर, अमित घोडसाद तसेच द न्यू मिलेनियम स्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, भाजपा कार्यकर्ते व संबंधित परिसरातील नागरिक आणि शालेय विद्यार्थी  उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, संपूर्ण देशात या मोहीमेनंतर दसरा, दिवाळीसारखे आनंदी वातावरण आहे. गेली सव्वा महिना देश ज्या ऐतिहासिक विजयी क्षणाची वाट पाहत होता तो क्षण केवळ देशानेच नाही तर संपूर्ण जगाने अनुभवला. या यशाने भारताचा जागतिक पातळीवरील दबदबा आणखी वाढला आहे. या मोहिमेतून जे यश मिळाले त्याचा फायदा संपूर्ण जगाला होणार आहे. या यशामुळे अमेरिकादेखील त्यांच्या 2025 मधील मोहिमेसाठी ‘इस्त्रो’कडून मार्गदर्शन घेणार आहेत.

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने भक्कम नेतृत्व लाभल्याने भारत सर्वच क्षेत्रात दमदार प्रगती करत आहे. पंतप्रधानांनी या मोहिमेकरीता दिलेले प्रोत्साहन, दाखवलेला विश्वास देखील अत्यंत महत्वपूर्ण ठरला. तोच विश्वास इस्त्रोने सार्थ ठरवीत चंद्राला गवसणी घातली. या प्रेरणादायी यशाबद्दल इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करतो.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button